पुण्यात ५६४ झोपडपट्या असून, त्यामध्ये सुमारे ४०% लोक राहतात. झोपडपट्यांमधील नागरिकांचे
जीवनमान उंचावावे, त्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी खा. सुरेश कलमाडींनी काँग्रेस
पक्षाच्या माध्यमातून सात्याने प्रयत्न केले.
JNNRUM खाली नदीपात्र, नाले अशा पर्यावरणाच्या दृष्टिने संवेदनाशील असणार्या झोपडपट्यांच्या
पुनर्वसनासाठी खा. सुरेश कलमाडींनी ३९५ कोटी रूपये आणले. केंद्रीय गृहनिर्माण आणि दारिद््रय
निर्मुलन मंत्री शैलजा कुमारी यांच्या हस्ते आणि खा. सुरेश कलमाडींच्या उपस्थितीत हडपसर
येथे ६ हजार घरांच्या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ ५ डिसेंबर २००६ रोजी संपन्न झाला.
४०,००० झोपडपट्टीवासियांच्या घराची सोय यातून होणार आहे. एकूण १६००० हून अधिक घरांची
निर्मिती त्यातून होणार असून, ती पुढीलप्रमाणे
कोंढवा - १७९२ सदनिका - ४५ कोटी रूपये
हडपसर - ६००० सदनिका - १०८ कोटी रूपये
कोथरूड - १६८० सदनिका - ३५ कोटी रूपये
वारजे - २५७६ सदनिका - ६३ कोटी रूपये
लोहगांव - ४४८० सदनिका - ९५ कोटी रूपये.
एकूण - १६५२८ सदनिका - ३४६ कोटी रूपये
झोपडपट्टीवासियांना स्वतःच्या मालकीची घरे मिळावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
निर्माण झाले. यामध्ये झोपडपट्टीवासियांना २५० चौ.फूट नव्हे तर ३५० चौ.फूटाचे घर मोफत
मिळाले पाहिजे, त्याचजागी पुनर्वसन आणि ७०% झोपडपट्टीवासियांची संमती या तीन प्रमुख
मागण्या खा. सुरेश कलमाडी यांनी केल्या त्यासाठी २६ नोव्हेंबर २००६ रोजी तेव्हाचे महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे झोपडपट्टीवासियांचा
भव्य मेळावा घेण्यात आला.
पुण्यातील झोपडपट्टीवासियांसाठी २५० ऐवजी ३५० स्क्वे.फूटाचे पक्के घर, ७०% झोपडपट्टीवासियांची
संमती, त्याच जागी पुनर्वसन, या तीन प्रमुख मागण्यांसाठी सुमारे दीड वर्षे खा. सुरेश
कलमाडींच्या नेतृत्वाखाली पुणे शहर काँग्रेसने आंदोलन छेडले. डठअ ची अन्यायकारक नियमावली
२६ मार्च २००७ रोजी जाहीर होताच, खा. सुरेश कलमाडींच्या सूचनेनुसार २९ मार्च २००७ रोजी
पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबईत मा. मुख्यमंत्र्यांची
भेट घेतली आणि या निर्णयास स्थगिती मिळविली. पाठोपाठ १ जून २००७ खा. सुरेश कलमाडींच्या
नेतृत्वाखाली झोपडपट्टीवासियांचा विशाल मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी
कार्यालयापर्यंत भर पावसात निघालेल्या या मोर्चात ३०-३५ हजारहून अधिक झोपडपट्टीवासिय
सहभागी झाले होते. हा मोर्चा झोपडपट्टीवासियांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांचे हात बळकट
करण्यासाठी असल्याची ग्वाहीही याप्रसंगी खा. सुरेश कलमाडींनी दिली. तसेच यासाठी मुंबईपर्यंत
लाँग मार्च काढण्याचीही घोषणा केली. मात्र ही वेळ आली नाही कारण मा. मुख्यमंत्र्यांनी
यासर्व मागण्या पूर्ण केल्या.
संरक्षण, वन आणि रेल्वे खात्याच्या जमिनींवरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यासाठी
खा. सुरेश कलमाडी प्रयत्नशील आहेत. झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी काँग्रेस
पक्षच काम करीत आहे हे खा. सुरेश कलमाडींनी दाखवून दिले.
बीएसयूपी योजनेअंतर्गत ३ लाख रुपयाचे अनुदाने देऊन झोपडपट्टीवासियांना सुमारे ४ हजार
पक्की घरे बांधून देण्यासाठी जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत १४८ कोटी रुपयांना निधी खा.
सुरेश कलमाडींनी मिळविला.
झोपडपट्टीतील काँग्रेस नगरसेविका सौ. रजनी त्रिभुवन यांना पुण्याचे महापौर पद देऊन
त्यांनी नवा इतिहास घडविला. झोपडपट्टीतील मुले महानगरपालिकेच्या शाळेत जातात, त्यांच्या
उज्ज्वल भवितव्यासाठी खा. सुरेश कलमाडींनी महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर
शिक्षण सुरू केले, इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. झोपडपट्टीतील मुले व तरूणांसाठी
काँग्रसचे आमदार रमेश बागवे यांनी कॉम्प्युटर मोबाईल व्हॅन सुरू केली. काँग्रेस पक्षाच्या
अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीनी त्याचे उद्घाटन केले. खा. सुरेश कलमाडींनी या उपक्रमाचे
कौतुक करून त्यास पाठबळ दिले. यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या पुढाकारातून वाल्मिकी, आंबेडकर
योजनेअंतर्गत झोपडपट्टीधारकांना ४० कोटी रूपये खर्चून ७ हजारहून अधिक घरे बांधण्यात
आली त्यास खा. सुरेश कलमाडींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. झोपडपट्टीवासियांना अधिकाधिक
नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी खा. सुरेश कलमाडी सदैव अग्रही राहिले होते.सर्व झोपडपट्यांमध्ये
घरोघरी पाण्याचे कनेक्शन, वस्तीत भरपूर वीजेची सोय, सार्वजनिक शौचालयांची वाढ, फरशी
बसविणे, गटारे बंदिस्त करणे आदि कामे करून घेण्यावर त्यांनी मोठा भर दिला.
झोपडपट्टीतील गरीब मुलांसाठी महानगरपालिकेच्या ३००हून अधिक शाळा असून त्यामध्ये सुमारे
१ लाख १५ हजार गरीब विद्यार्थी शिकतात, त्यांच्यासाठी १०० कोटी रूपयांहून अधिक बजेट.
झोपडपट्टीतील महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले.
झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी खा. सुरेश कलमाडींनी काँग्रेस पक्षाच्या
माध्यमातून सातत्याने दिलेले योगदान झोपडपट्टीवासिय कधीच विसरू शकत नाही.