बंगलोर प्रमाणेच पुणे देखील उद्यानांचे शहर व्हावे हा ध्यास खा. सुरेश कलमाडींनी घेतला. अस्तित्वात असणार्या बागांचे सुशोभिकरण करतानाच नवी उद्याने तयार होण्यावर त्यांनी भर दिला. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक उद्यानांचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले व त्यास निधी उपलब्ध करून दिला.
पुण्यात ७८ उद्याने पूर्ण झाली असून लवकरच १०० उद्याने पुण्यात पूर्ण होतील. १०० उद्याने असणारे पुणे शहर त्यामुळे उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जाणार यात काही शंका नाही.
जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारलेले पु. ल. देशपांडे उद्यान, नाला गार्डन, गुलाबांचे उद्यान, औषधी वनस्पतींचे उद्यान ही तर पुण्याची खास वैशिष्ठये ठरली आहेत. याशिवाय प्रत्येक बागेत जॉगिग ट्रॅक, बसायला बाके या सुविधाही त्यांनी उपलब्ध करून घेतल्या.
सहकारनगर भागात सिगापूर धर्तीवर देशातील दुसरी फुलपाखरांची बागही त्यांच्याच प्रेरणेतून तयार झाली आहे.
ऐतिहासिक शनिवारवाड्याचे साऊंड अॅन्ड लाईट हा रंगीत थुईथुई नाचणार्या रंगीबेरंगी कारंज्यावर आधारलेला कार्यक्रम हा त्यांचाच पुढाकाराने झाला. पुण्याच्या ऐतिहासिक लौकिकात मोलाची भर पडली आहे. १० कोटी रूपये खर्च करून पेशवेकालीन शनिवारवाडा पुनः उभारण्याची योजना व पुरात्व खात्याकडून अभ्यासासाठी वास्तुविशारद नेमण्यासाठी पाठपुरावा करीत आहे.