पुणे हे देशातील तरूण शहर म्हणून ओळखले जाते. स्व. राजीव गांधींनी मतदानाचे वय २१ वरून
१८ वर्षापर्यंत आणले. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत साडेचार लाख नवे तरूण मतदार
झाले. यावेळी सुमारे १८ लाख मतदारांपैकी १८ ते ४० वयोगटात ४८ टक्के म्हणजे सुमारे साठे
आठ लाख तरूण मतदार आहेत. संसदेत राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली ज्योतिरादित्य सिधिया,
नवीन जिदल, सचिन पायलट, मिलिद देवरा, प्रिया दत्त आदि तरूण खासदारांचा गट मोठ्या धडाडीने
काम करीत आहे. स्वतः खा. सुरेश कलमाडी युवक काँग्रेस पासून तरूणांच्या चळवळीत काम करीत
होते. त्यामुळे तरूणांसाठी खूप काही करण्याची त्यांची धडपड राहिली आहे.
पुणे ‘बेरोजगार विरहित शहर’ करण्यासाठी खा. सुरेश कलमाडी सदैव प्रयत्नशील राहिले. प्रत्येक
गरीब विद्यार्थ्यास, तरूणास कॉम्प्युटर शिक्षण मिळावे यासाठी महानगरपालिका शाळांमधून
कॉम्प्युटर शिक्षणास त्यांनी सुरूवात केली. पुणे महानगरपालिकेचे कॉम्प्युटर लायब्ररी
व ट्रेनिग सेंटर सुरू केले.
परदेशातून देशात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यापैकी ५०% विद्यार्थी पुण्यात आहेत.
तसेच पुण्यात ५ विद्यापीठे आहेत. तरूणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व वाढावी यासाठी
पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून अष्टविनायक, मोटार सायकल रॅली, गिरीभ्रमण व गिर्यारोहण,
सायकल रेस, कयाकिंग व याकिग स्पर्धा, रोलबॉल स्पर्धा, मोटोक्रॉस अशा अनेक क्रीडास्पर्धांचे
त्यांनी सातत्याने आयोजन केले. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि १८ वर्षाखालील युवकांसाठी
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा पुण्यात भरवून त्यांनी युवकांच्या उत्साहाला वाट करून
दिली.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गतच इंद्रधनू आणि उगवते तारे हे उगवत्या कलाकारांसाठी व्यासपीठ,
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील
पहिल्या ३ एकांकिकाचे पुणे फेस्टिव्हलमध्ये प्रयोग. अभिनय, दिग्दर्शन, अॅनिमेशन, पटकथा
संवाद लेखन आदि क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे
त्यांनी स्पर्धा व पुरस्कारही सातत्याने आयोजित केले. तसेच तरूणांमध्ये व्यायामाची
आवड निर्माण व्हावी यासाठी स्वतःच्या खासदार निधीतून विविध ठिकाणी व्यायामशाळा उभारण्यासाठी
मोठा निधी उपलब्ध केला.
पुण्याची वाढ होत असताना स्थानिक तरूणांना ७५% नोकर्यांमध्ये प्राधान्य देणार्या
कंपन्यांना महानगरपालिका व राज्यशासनाच्या वतीने विशेष सवलती देण्यासाठीही ते प्रयत्नशील
राहिले. तसेच मतदार यादीत नव्याने मतदार झालेल्या तरूणांनी नावनोंदणी करून घ्यावी यासाठीही
ते सदैव प्रयत्नशील राहिले.
या सर्वांमुळे तरूणांना न्याय देणारा खासदार अशी त्यांची रास्त प्रतिमा झाली आहे.