पुणे  रोजगार निर्मितीत अग्रेसर

पुणे ही उद्योगनगरी असून, टेल्को, बजाज ऑटो, बजाज टॅम्पो, किर्लोस्कर ग्रुप, गरवारे ग्रुप, डेव्हिन ब्राऊन, बकाव वूल्फ, अॅटलॅस कॅप्को, थरमॅक्स याबरोबरच अॅम्युनेशन फॅक्टरी, हिदुस्थान अँटेबायटिक्स सारख्या कंपन्यांनी पुण्याचा औद्योगिक पाया रचला. त्यामध्ये IT – BT व Auto प्रमाणेच पुणे हे Animation & Gaming चे महत्वाचे केंद्र बनत आहे. प्रचंड मोठे मॉल्स, मल्टिप्लेक्स, वेअरहाऊसेस, हॉटेल्स आदि उभारले जात असून, या सेवा उद्योगांमध्ये देखील हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, अतिशय सुसज्ज भव्य रेल्वे स्टेशन, पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे यामुळे पुण्याला मोठा फायदा झाला. त्यातून रोजगार निर्मितीलाही नवी चालना मिळाली.

पूर्वी पुण्यात थिएटर्स हाऊसफुल्ल व्हायची, आता हॉटेल्स आणि विमाने हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत.

२००४ च्या लोकसभा निवडणूकीवेळी पुण्यात दरवर्षी १ लाख नवे रोजगार निर्माण होतील असे खा. सुरेश कलमाडी म्हणाले होते. त्यापेक्षा जास्त रोजगार सध्या पुण्यात निर्माण होत आहे. स्थानिक तरूणांना ७५% नोकर्‍या देणार्‍या कंपन्यांना अनेक सवलती देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
पुणे शहर खर्‍या अर्थाने ‘सुखी शहर’ व्हायचे असेल तर प्रत्येकाला चांगला रोजगार मिळालाच पाहिजे या खा.कलमाडींच्या भूमिकेला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आणि त्यामुळेच पुणे हे मोठा रोजगार उपलब्ध करून देणारे देशातले महत्वाचे शहर बनले.

Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik