पुण्यातील रस्ते रूंद आणि सुरळीत वाहतुकीसाठी टिकाऊ असण्यावर खा. सुरेश कलमाडींनी सदैव भर दिला. दीर्घकालीन टिकाऊ रस्ते बांधण्याचा धडाकेबाज कार्यक्रमही त्यांनी आखला. रस्ता पुन्हा पुन्हा खणायला लागू नये यासाठी सर्व सव्र्हिस लाईन्स बाजूला घेऊन, ऊार्ीलींळपस करून दीर्घकालीन टिकणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते करण्यावर त्यांचा कटाक्ष राहिला.
एकात्मिक रस्ते विकास योजनेचे काम धडक रीतीने सुरू केले. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २००८ मुळे अनेक रस्ते व चौकांचे सुशोभिकरण झाले. विमानतळ ते राजभवन, विश्रांतवाडी, आळंदी रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण-सूस रस्ता इत्यादी रस्ते प्रशस्त व उत्तम दर्जाचे झाले. याआधी नगररस्ता, सिहगड रस्ता, आळंदी रस्ता यांचेही सिमेंटीकरण पूर्ण झाले.
बाणेर येथील भुयारी मार्ग आणि पुणे रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्ग या दोन्ही महत्वाच्या बाबी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेमुळे वेगाने मार्गी लागल्या. तसेच मुंबईहून बाह्यवळण मार्गाने पुण्यात यायला एकच मार्ग होता. आता औंध, बाणेर, सूस, पाषाण रोड असे चांगले मार्ग तयार झाले आहेत.
ेब्रुवारी २००७ मध्ये पुण्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती मार्फत १४२ कोटी रूपये निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे पुढील ४ महिन्यात पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे तर बुजलेच शिवाय अनेक रस्ते प्रशस्त होऊन डांबरीकरण व सिमेंटीकरणही पूर्ण झाले.