रेल्वे राज्यमंत्री - प्रभावी कामगिरी

१९९५-९६ मध्ये पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात खा. सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री झाले. सुमारे ९ महिन्यांच्या कारकीर्दीत अतिशय कार्यक्षमतेने त्यांनी या खात्याचा कारभार बघितला. रेल्वे खात्याच्या अर्थसंकल्प संसदेत मांडणारे ते पहिले रेल्वे राज्यमंत्री बनले.(१६ सप्टेंबर १९९५ ते १५ जून १९९६)

त्यांनी मांडलेल्या रेल्वे बजेटमध्ये कलाकार, खेळाडू, वृद्ध व शौर्यपदक विजेत्यांना विशेष सवलती देण्यात आल्या. पुणेकरांचे जुने स्वप्न पूर्ण करून पुण्याला रेल्वेचा ‘स्वतंत्र विभाग’ म्हणून मान्यता देण्याची भूषणावह कामगिरी त्यांनी केली. यामुळे वेगळी आर्थिक तरतूद होऊन नव्या रेल्वे योजना व अधिक स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळाली. त्याद्वारे शहर व राज्याच्या गतिमान विकासास हातभार लागला.
महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी मुंबई व्हि.टी. चे ‘श्री छत्रपती शिवाजी टर्मिनर्स’ असे नामकरण त्यांनी केले. मुंबईतील रोजच्या ५५ लाख रेल्वे लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी विविध विकास प्रकल्प त्यांनी कार्यन्वित केले. याआधी असणारी ६० कोटी रू.ची तरतूद, १९९६-९७ च्या बजेटमध्ये १३०० कोटी रूपये एवढी वाढवून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पुणे-मुंबई वेळ कमी होण्यासाठी कर्जत-पनवेल लाईन प्रकल्प व त्याच्या सर्वेक्षणासाठी ९० कोटी रूपयांची तरतूद केली. डेक्कन-क्वीन व सिहगड ए-क्सप्रेस यांचे नूतनीकरण करतानाच पुणे-मुंबई शताब्दी एक्सप्रेस ही नवी गाडीही त्यांनी सुरू केली. पंढरपूर तीर्थक्षेत्र देशाला जोडण्यासाठी रेल्वे मार्ग व विठ्ठल मंदिरसदृश रेल्वे स्टेशनचे काम सुरू केले. शिर्डी व तुळजापूर जोडण्यासाठी पाहणी सुरू केली. तिरूपती, नांदेड, अमृतसर, काशी व अजमेर या तीर्थक्षेत्रांस विशेष रेल्वेसाठी प्रस्ताव तयार केले व योजना आखली. पुणे-अहमदाबाद अहिसा एक्सप्रेस आठवड्यातून ३ वेळा तसेच रेल्वेच्या स्वतंत्र ‘अहमदाबाद विभागा’ चीही स्थापना त्यांनी केली. पुणे-कलकत्ता आझाद हिद एक्सप्रेस व पुणे-वाराणसी ज्ञानगंगा एक्सप्रेस नव्याने सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. पुणे स्टेशन, खडकी, दापोडी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यावर त्यांनी भर दिला.
लोकल प्रवाशांचे प्रश्न सुटण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आरक्षणाचे संगणकीकरण करण्यावर त्यांनी भर दिला तसेच रेल्वे स्थानकांवरील हमालांना वर्षातून एकदा ५०* सवलतीत रेल्वे प्रवासाची अनोखी सुविधा व त्यांच्यासाठी विशेष विश्रांतीगृहे करून रेल्वे राज्यमंत्री खा. सुरेश कलमाडी यांनी कष्टकर्‍यांबद्दल त्यांना असणारा जिव्हाळा दाखवून दिला. २१ व्या शतकातील पुण्याच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करून थोर प्रशासक कै. स.गो. बर्वे यांचे ‘आदर्श पुण्या’ चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ते कटिबद्ध राहिले. पुढे सुमारे १० वर्षात पुण्यासाठी रेल्वेचे अनेक उपक्रम त्यांनी आणले. त्यामध्ये पुणे-पाटना, पुणे-लखनौ, पुणे-जोधपूर, बंगलोर-पुणे-दिल्ली, पुणे-नाशिक अशा अनेक नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik