पुण्याची झपाट्याने वाढ होत असताना शहरातील पथारीवाले, हातगाडीवाले आणि फेरीवाले यांचा
प्रश्नही वाढत राहिला. हातावर पोट असणार्या या गरीब वर्गाचे पुनर्वसन करण्याचा ध्यास
खा. सुरेश कलमाडींनी घेतला. आधी पुनर्वसन- मग कारवाई या त्यांच्या भूमिकेमुळे पथारीवाले,
हातगाडीवाले, फेरीवाले यांना मोठा दिलासा मिळाला.
पथारीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी JNNRUM अंतर्गत
२८ कोटी रुपयांचे पथारी, फेरीवाले व हातगाडी व्यावसायिकांसाठी २० हजार पक्के गाळे बांधण्याची
योजना त्यांनी मार्गी लावली आणि अजून २० हजार पक्क्या गाळ्यांसाठी ते प्रशत्नशील आहेत
पथारी, फेरीवाले व हातगाडी व्यावसायिक यांसाठी अशी योजना राबविणारे पुणे हे पहिले शहर
त्यामुळेच बनले. वडगांवशेरी येथे ५ डिसेंबर २००६ रोजी श्रमिकांचे नेते डॉ. बाबा आढाव
यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहनिर्माण व दारिद्रय निर्मूलन मंत्री शैलजा कुमारींच्या
हस्ते व खा. सुरेश कलमाडींच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. यासाठी JNNRUM
अंतर्गत २८ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात स्टॉलधारकांसाठी
३११३, हातगाडी व्यावसायिकांसाठी ३१७२ आणि बैठे फेरीवाल्यांसाठी १२३७ गाळे उभारले जाणार
असून, ७६ ठिकाणी चळपळ चरीज्ञशीं उभारण्यासाठी खा. सुरेश कलमाडी यांनी पुढाकार घेतला.
कागद, काच, कचरा गोळा करणार्यांसाठी ही योजना लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.