पुणे - मुबलक पाणी पुरवठ्याचे नियोजन

‘ पाणी हे जीवन आहे’

पाणी पुरवठ्याबाबत पुणेकर सुखी आहेत. इतके मुबलक पाणी क्वचितच दुसर्‍या शहरांत मिळत असेल.सर्व भागातील पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे. ३५० कोटींची महत्वाकांक्षी योजना पूर्ण करून २०११ पर्यंतचे पाण्याच्या नियोजनाचे काम खा.सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले.
अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प तज्ञांच्या मदतीने सुरू करतानाच त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध होईल याकडेही खा. सुरेश कलमाडींनी बारकाईने लक्ष दिले. खडकवासला धरणातून बंद पाईप मधून पाणी आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबविला. याबरोबरच अनेक जलशुद्धीकरण प्रकल्पांनाही चालना दिली.

वडगांव, होळकर, वारजे अशा महत्वाकांक्षी मोठ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करून हे प्रकल्प त्यांनी पूर्ण करून घेतले त्यामुळे पाणी वाटप यंत्रणेच्या विक्रेंद्रीकरणामुळे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावरचा ताण कमी झाला.  पाणी वाटप यंत्रणेतील सुधारणेमुळे सर्वत्र समान दाबाने पाणी मिळू लागले. चांदणी चौकातील मोठ्या पाण्याच्या टाकीमुळे पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनीचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला. गांधीभवन, रामटेकडी, केदारेश्वर, आगम मंदिर, कोंढवा, बालाजीनगर, बिबवेवाडी याही भागात पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. बहुतांशी ठिकाणी पाणी पुरवठा सुरूळीत सुरू झाला.

JNNRUM अंतर्गत १०० कोटी रूपयांची नदीसुधार योजना मंजूर करून घेऊन खा. सुरेश कलमाडींनी नदीपात्राची खोली वाढवणे, चॅनेल बांधणे, गाळ व पान वनस्पती काढून टाकणे, नदीकाठी सुशोभिकरण, डासांचे निर्मुलन असे प्रकल्प मार्गी लावले.

खा. सुरेश कलमाडींच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना प्रशासनाने सुमारे ७५०कोटी रूपयांची केली होती. मात्र खा. सुरेश कलमाडींनी हीच योजना तज्ञांच्या मदतीने ३४५ कोटी रूपयात बसविली. याचे सर्वत्र कौतुक झाले. यातीलच एक प्रकल्प म्हणजे होळकर ब्रीज पंपिंग स्टेशनचा प्रकल्प ! इ.स. २००० मध्ये हा प्रकल्प सादर केला गेला आणि लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन वडगांव शेरी, खराडी, विमाननगर, आळंदी रोड येथील सुमारे २ लाख नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू होऊन हा सारा परिसर टँकरमुक्त होईल. नुकतीच २५ नोव्हेंबर २००८ रोजी पूर्ण होत आलेल्या या प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय पुण्यातील आंबिल ओढा सुशोभीकरण, नदीकाठी संरक्षक भित आदि प्रकल्पही ते मार्गी लावत आहे. पुण्याला २४ x ७ सलग पाणीपूरवठा व्हावा यासाठी १००० कोटी रूपयांची योजना मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik