JNNRUM पुण्याच्या विकासाचा  Password

काँग्रेस पक्षाध्यक्षा व ण.झ.अ. अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांच्या पुढाकाराने देशातील ६२ शहरांच्या विकासासाठी १ लाख कोटी रूपयांची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली. शहरातील गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पायाभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना कार्यान्वित झाली, त्यात पुण्याचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. JNNRUM हा विकासाचा password  च मानला गेला.

पुण्याच्या विकासासाठी अनेक योजना आखून, काँग्रेस पक्षाने खा. सुरेश कलमाडींच्या मार्गदर्शनाखाली याचा पाठपुरावा केला. पुणे महानगरपालिकेचा  e-governance आणि अन्य अटीं वेळेत पूर्ण करून घेतल्या. या योजनेअंतर्गत निधी मिळविणार्‍या पहिल्या काही निवडक शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाला. पुण्यात झालेल्या ३ र्‍या राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धेमुळे हा निधी मोठ्या प्रमाणात आणि प्राधान्याने येण्यास मोलाची मदत झाली.

पर्यावरणाच्या दृष्टिने संवेदनाशील असणार्‍या नदीपात्र, नाले येथील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसनासाठी ३५० कोटी रूपये व त्यांना पक्की घरे, पथारीवाल्यांना पक्के गाळे, नदीसुधार योजना, नवे रस्ते, इलेव्हेटेड रस्ते, नाईट शेल्टर, अतिजलद बस सेवा (BRT) इत्यादी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्यास मिळाले.  त्यासाठी २५०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात खा. सुरेश कलमाडी यशस्वी झाले आहेत. अधिक निधी आणण्यासाठी खा. सुरेश कलमाडी प्रयत्नशील आहे.

सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काँग्रेस पक्षाने आपली ध्येयधोरणे नेहमीच आखली आणि राबविली. राजकारण कोणासाठी करायचे हे आम्ही चांगले जाणतो असे खा. सुरेश कलमाडी अनेकदा म्हणतात. सामान्य माणसाच्या हितासाठी आणि विकासासाठी जे जे करावे लागेल, ते म्हणजेच राजकारण अशी त्यांची भूमिका राहिली आहे. ‘विकासात आम्ही राजकारण आणत नाही’ ही त्यांची  भूमिकाही सदैव महत्वाची राहिली आहे.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुर्ननिर्माण प्रकल्पांतर्गत पुणे शहराला मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुरेश कलमाडी यांनी संसदेत केंद्रीय नगरविकास खात्याचे मंत्री जयपाल रेड्डी यांचे आभार मानले त्याचबरोबर पुणे शहरातील कॅन्टोन्मेटसाठी देखील हा निधी मिळाला पाहिजे अशी मागणी केली. तेंव्हा केंद्रीय नगरविकास मंत्री जयपाल रेड्डी यांनी, हा मोठा विकास निधी पुण्याला मिळण्याचे श्रेय खा. सुरेश कलमाडींना देताना म्हटले की, ‘मी काही उदार माणूस नाही, मात्र पुण्यासाठी हा निधी खा. सुरेश कलमाडींनी माझ्याकडून जणू हिसकावूनच घेतला’. पुण्याच्या विकासासाठी या योजने अंतर्गत भरीव निधी खा. सुरेश कलमाडींनीच उपलब्ध करून घेतला याची ही पावतीच मानावी लागेल.
या योजनेतील निधीमुळे पुण्यात प्रशस्त रस्ते, चांगले फुटपाथ, चौकांचे रूंदीकरण व सुशोभिकरण, बाणेर व पुणे रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्ग हे सर्व राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेपूर्वीच तयार झाले. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खा. सुरेश कलमाडींनी पुणे शहराला मिळवून दिलेली ही कायमस्वरूपी मोठी भेटच मानावी लागेल.


Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik