पेन्शनरांचे शहर, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, उदयोगनगरी, क्रीडानगरी, पर्यटननगरी,
उद्याननगरी, महोत्सवांचे शहर, सुखी शहर, धार्मिक सलोख्याचे शहर आणि आता Cyber Capital
होण्याकडे पुण्याची वाटचाल होत आहे. देशात स्व. राजीव गांधींनी IT Revolution केली.
पुणे यामध्ये मागे राहणे शक्यच नव्हते. देशाचे cyber capital हैद्राबाद, बंगलोर नव्हे
तर पुणे असेल, या दृष्टिने पुण्याची वाटचाल चालू राहिली आहे.
आपले पुणे अनेक बाबतीत देशात नं. १ आहे. स्वयंचलित दुचाकी वाहने असो, personal computers
चा वापर असो, सरासरी दरडोई उत्पन्न (per capita income) असो या सर्वच बाबतीत पुणे देशात
नं. १ आहे. अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. आता खढ मध्येही पुणे देशात नं. १ बनण्याकडे
वाटचाल चालू आहे.
पुणे IT City झाली हे आपोआप झाले नाही. IT क्षेत्राची पुण्यात गुंतवणूक वाढावी म्हणून
काँग्रेस पक्षाने खा. सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखाली क्रांतीकारी निर्णय घेऊन, पुणे
महापालिकेच्या माध्यमातून या उद्योगाला अनेक घसघशीत सवलती दिल्या. प्रॉपर्टी टॅक्समध्ये
भरघोस सवलत, दोन चटई निर्देशांक आणि जकात माफी या क्रांतीकारक आणि दूरदृष्टीच्या निर्णयांमुळे
मोठ्या प्रमाणावर IT कंपन्या पुण्यात आकर्षित झाल्या.
गेल्या ६-७ वर्षात सुमारे ६०० हून अधिक IT कंपन्या पुण्यात आल्या. Infosys, Wipro,
Satyam, Persistent, Zensar, KPIT Cummins, TCS, Tata Technology, Canbay, Accenture,
Cognizant, Tech Mahindra, Nihiland, BMC Software या सारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांबरोबरच
IBM, Microsoft या सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्याही पुण्यात आल्या. IT क्षेत्रातील पुण्याची
निर्यात २ Billion Dollars होती.२००६-०७ मध्ये ती ३.५ Billion Dollars झाली. या वर्षी
हीच निर्यात ५ Billion Dollars म्हणजेच २५,००० कोटी रूपये झाली आहे. पूर्वी अमेरिकेतील
Silicon Vally चे नाव आपण घ्यायचो, आता अमेरिकेतील Silicon Vally तील लोक खराडी, हिंजेवडी
ची नावे घेतात. एका ठिकाणी सर्वाधिक IT पार्क असणारे पुणे हे देशातील पहिले शहर आहे.
पुण्यातून पुर्वी brain drain होत होते,आता brain gain आहे. यामुळे अतिशय उत्तम पगाराचा
मोठा रोजगार निर्माण झालाच शिवाय अप्रत्यक्ष रोजगारही मोठ्या प्रमाणात वाढला.
पुण्याच्या विकासाबाबत सदैव योगदान देणार्या ‘पुणे व्यासपीठ’ या संस्थेचे खा. सुरेश
कलमाडी अध्यक्ष आहे. त्यांच्या पुढाकाराने पुणे शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवर Hi-Tech
Pune ही परिषद गेली ६ वर्षे आयोजित होत आहे. यामध्ये IT–BT, Animation – Gaming वर
सखोल चर्चा होऊन या तंत्रज्ञानाचा विकास, उपयोग आणि गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन
मिळते. यास देश-परदेशातून मोठा प्रतिसाद मिळत असून, पुण्यात IT–BT, Animation – Gaming
क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे. Infosys चे श्री. नारायण मूर्ती
यांनी पुण्याला या क्षेत्रात खूप महत्वाचे स्थान असून, पुण्याला खूपच झुकते माप देण्याचे
सांगितले ही बाब महत्वाची आहे.
अधिक माहितीसाठी www.punevyaspeeth.org