पुणे - गरीब मुलांसाठी इंग्रजी / संगणक शिक्षण

पुणे हे विद्येचे माहेरघर असून, एकीकडे उच्च शिक्षणाच्या सुविधा व facilities  वाढत असताना शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणार्‍यांची मुलेही चांगली शिकली पाहिजे.  यासाठी खा. सुरेश कलमाडींनी सातत्याने प्रयत्न केले. याचबरोबर पुणे ‘संगणक साक्षर’ बनविण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या खासदार निधीतून २ कोटी रूपयांहून अधिक रक्कमेचे संगणक त्यांनी आत्तापर्यंत दिले आहेत.

याचबरोबर दिवसा काम करणार्‍या तरूणांसाठी रात्रशाळा सुरू करण्यावरही त्यांनी भर दिला. २१ व्या शतकात जात असताना स्थानिक मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषाही यायला हवी आणि त्यामध्ये गरीबांची मुले मागे राहू नये त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांनी सुरू केल्या.

Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik