पुणे - धार्मिक सलोख्याचे शहर

प्रदिर्घ काळापासून पुणे हे धार्मिक सलोख्याचे शहर म्हणून ओळखले जाते. बाबरी मशिद पडली तेव्हा देशात सर्वत्र दंगली झाल्या मात्र पुणे शांत राहिले. त्याचे मुख्य कारण म्हणजे पुण्याला धार्मिक सलोख्याची परंपरा आहे. घोरपडी येथे मशिद आणि मंदिर शेजारी शेजारी - दोघांची भिंत कॉमन आहे हे केवळ पुण्यातच दिसून येते.

राष्ट्रीय एकात्मतेचे पुणे हे प्रतिक बनले आहे. पुणे - काश्मिर मैत्री चौक पुण्यात आहे. उद्योग व्यवसायांच्या वृद्धीसाठी हे सलोख्याचे वातावरण आवश्यक असते. ‘आम्ही परिस्थिती OUT OF HANDS जाऊ देत नाही’ असे खा.सुरेश कलमाडी म्हणाले ते सर्वार्थाने खरे आहे.
पुण्यातील गणेशोत्सवात गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे फेस्टिव्हल अंतर्गत देशातील मोठा उर्दु मुशायरा होतो. ही सारी पुण्याचीच संस्कृती आहे. सर्व धर्म समभाव येथे रूजवण्यात काँग्रेस पक्ष आणि           खा. सुरेश कलमाडी यांचे मोठे योगदान आहे असे सर्व धर्माचे नागरिक म्हणतात.

Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik