पुणे - दलित समाजासाठी सदैव योगदान

पुणे हे दलित चळवळीच्या दृष्टिने महत्वाचे केंद्र मानले जाते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार येथेच झाला. सामाजिक समतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे घर म्हणजे समता भूमी पुण्यात आहे. थोर क्रांतीवीर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांनी देखील श्रमिकांच्या चळवळीला येथे नवचैतन्य दिले. पुण्याच्या संपूर्ण वाटचालीत व विकासात दलित समाजाने फार मोठे योगदान दिले आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यात दीर्घकाळ काँग्रेस पक्षाने खा. सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखाली दलित समाजाला न्याय दिला आहे. डॉ. आंबेडकर भवन, अण्णा भाऊ साठे स्मारक यांची निर्मिती पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि     खा. सुरेश कलमाडींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हाधिकारी कचेरी समोरील डॉ. आंबेडकर पुतळ्यास मेघडंबरी देखील त्यांनीच पुढाकार घेऊन महानगरपालिकेकडून बसवून घेतली. पुण्याची पहिली दलित महिला महापौर या सौ. रजनी त्रिभुवन होत. त्यांना महापौर करण्याचे सारे श्रेय खा. सुरेश कलमाडींचे आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दलित महिलेला पुण्याचे महापौर पद देऊन त्यांनी जणू दलित समाजाबद्दल त्यांना वाटणारी आत्मियताच व्यक्त केली आहे.

यापूर्वी वाल्मिकी आंबेडकर योजनेतून  गरीबांसाठी सुमारे ७ हजाराहून अधिक घरे बांधली. तसेच दलित तरूणांनी स्वयंरोजगारावर भर द्यावा, इंग्रजी व कॉम्प्युटर शिक्षण घ्यावे यासाठी सदैव प्रेरणा दिली व प्रयत्न केले. दलित समाज एकसंघ करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी ते करीत असलेले भरीव कार्य पुण्यातील दलित समाज विसरू शकत नाही.
Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik