प्रदुषण मुक्त पुण्यासाठी CNG

पुणे प्रदुषण मुक्त राहण्यासाठी छ्ण्घ चा मोठ्या प्रमाणात वापर करणे महत्वाचे आहे. त्यासाठी खा. सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळेच देशात छ्ण्घ चा पुरवठा होणार्‍या पहिल्या महत्वाच्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाला.

पुण्यात पिपरी येथे CNG स्टेशन सुरू झाले असून, पुण्याकडे CNG पाईपलाईन टाकण्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धानिमित्ताने बालेवाडी हा CNG पाईपलाईनचा नवा मार्गही सुरू करण्याविषयी खा. सुरेश कलमाडींनी आग्रह धरला. तसेच या स्पर्धांपूर्वी पुण्यात CNG चा पुरवठा सुरू व्हावा या त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन १० ऑक्टोबर २००८ रोजी पुण्यात वारजे येथे पहिल्या CNG पंपाचे उद्घाटन खा. सुरेश कलमाडींच्या हस्ते संपन्न झाले आणि पुण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टिने नवा अध्याय सुरू झाला.

CNG पाठोपाठच घराघरात बंद नळावाटे गॅसचा पुरवठा करून ‘सिलेंडर मुक्त पुणे’ या खा. सुरेश कलमाडी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याकडे वाटचाल सुरू राहिली. सिलेंडरची वाट पहाण्याचे दिवस त्यामुळे संपणार आहे. पुणे आणि पिंपरी चिचवड मध्ये घरोघरी पाईपद्वारा गॅस पुरविण्याचा प्रकल्प ऋअखङ कंपनी मार्फत सुरू होत आहे.

या महत्वाकांक्षी योजनांमुळे पुण्यातील हवेच्या प्रदुषणात मोठी घट होणार आहे. त्यापूर्वी १५ वर्षे जुन्या झालेल्या रिक्षांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी भुरेलाल समितीच्या शिफारशींचे काटेकोरपणे पालन करायला लावून जुन्या रिक्षांना एल.पी.जी.किट बसवून घेणार्‍या रिक्षा मालकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून सबसिडी देऊन प्रोत्साहन देण्यावर खा. सुरेश कलमाडींनी भर दिला होता.

Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik