AUTO CLUSTER

पुणे आता AUTO CLUSTER बनत आहे. पुण्याला Detroit of the East ही म्हटले जात आहे. पुण्यामध्ये टाटा मोटर्स, बजाज ऑटो, बजाज टेंपो या जागतिक किर्तीच्या कंपन्या आहेतच. त्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मोटार कंपन्यांनीही पुण्याला पसंती दिली आहे. General Motors, Volks Wagen, Mercedes Benz, Mahindra या वाहन उद्योगातील जगप्रसिद्ध नामवंत कंपन्या पुण्यात आल्या असून, Tata - Fiat आणि Bajaj  कंपनीचे नवे मोठे प्रकल्प पुण्याजवळ उभारले जात आहेत. पुणे हे आता Global Sourcing of Auto Parts Ancillaries’  देखील बनत आहे. येत्या ५ वर्षात IT BT सोबतच वाहन उद्योग, हार्डवेअर व अन्य उद्योगात हजारो कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक पुण्यात अपेक्षित आहे. पुण्याची ‘भारत फोर्ज’ ही कंपनी जगातील पहिल्या क्रमांकाची फौर्जिंग कंपनी बनली आहे. ५ लाख टन फौर्जिग क्षमता असणारी जगातील पहिल्या क्रमाकांची ही कंपनी बनणार. जगातील मोटार उद्योगांना पोलाद पुरवणारी पोस्को (झेीले) ही दक्षिण कोरियाची कंपनी पुण्यात आपले  Processing Unit  तळेगाव येथे सुरू करीत आहे. वाहन उत्पादक कंपन्यांच्या या गुंतवणूकीमुळे पुण्यात लघुउद्योगही वाढणार असून, त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. 

Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik