पुणे - अल्पसंख्याकांना सदैव न्याय

काँग्रेसची अल्पसंख्यांक समाजाला सदैव साथ लाभली आहे. मुस्लिमांना योग्य न्याय फक्त काँग्रेस पक्षानेच दिला आहे. देशातील अल्पसंख्यांकांकरिता केवळ काँग्रेस सरकारनेच स्वतंत्र खाते केंद्रात निर्माण केले. देशात ३०% भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक आहेत.देशातील मुस्लिमांच्या पाहणीसाठी न्या.सच्चर कमिटी नेमली त्याचा अहवाल युपीए सरकारने स्विकारला. मुस्लिमांचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न काँग्रेस पक्षाने सातत्याने केले. देशातील मुस्लिमांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा turning point  आहे. बँक, रेल्वे आदि सार्वजनिक क्षेत्रात त्यांच्या नोकर्‍या वाढविणार तसेच कर्जपुरवठ्यातही वाढ करण्याबाबत खा. सुरेश कलमाडी सदैव अग्रभागी राहिले. या कमिटीच्या अहवालाची अमंलबजावणी सुरू करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध राहिला आहे. मुस्लिमांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचवणे यातून साध्य होईल.

काँग्रेस पक्ष हा सदैव secular  राहिला आहे. पुण्यात खा. सुरेश कलमाडींच्या प्रेरणेतून मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक उभारले गेले. तेथे मुस्लिम स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे स्मारक उभारले जाईल. या स्मारकात मुस्लिम तरूणांसाठी रोजगार मार्गदर्शन केंद्र आणि कॉम्प्युटर प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होत आहे. मुस्लिम समाजाने कॉम्प्युटर शिक्षण व इंग्रजीवर अधिक भर द्यावा यासाठी खा. सुरेश कलमाडी सदैव अग्रही राहिले आहे. पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेच्या हाजी अब्दुल लतिफ उर्दु शाळेस १० लाख रूपयांचे ३० कॉम्प्युटर त्यांनी स्वतःच्या खासदार निधीतून दिले. पुण्यात महानगरपालिकेच्या सुमारे ३०० शाळा,त्यामध्ये उर्दु माध्यमाच्या २९ शाळा आहेत. या २९ शाळांमध्ये एकूण ८००० मुले उर्दु माध्यमात शिकत आहेत. त्यात मुलींची संख्या सुमारे ५००० आणि मुलांची संख्या सुमारे ३००० आहे. उर्दु भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी चालू असणार्‍या प्रयत्नांना खा. सुरेश कलमाडींनी सदैव पाठबळ दिले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर फातिमा बी. यांनीही महिलांच्या शिक्षणाचे मोठे कार्य केले, त्यांच्या नावाने दहावी परीक्षेत मेरीट मध्ये येणार्‍या मुस्लिम विद्यार्थीनीस शिष्यवृत्ती खा. सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सुरू केली.
मुस्लिमांच्या दफनभूमीचे प्रलंबित प्रश्न खा. सुरेश कलमाडींनी प्राधान्याने सोडविले. मुस्लिम समाजाच्या मागणीनुसार दफनभूमींची संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मुस्लिम समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्टया मागे पडला आहे त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलेच पाहिजे, यासाठी मुस्लिम तरूणांनी स्वयंरोजगारावर भर द्यावा असे खा. सुरेश कलमाडी सदैव आव्हान करतात. पुण्यात राजकीय क्षेत्रात खा. सुरेश कलमाडींनी मुस्लिम समाजाला नेहमीच न्याय दिला. महापौर अली सोमजी, उपमहापौर नजमा खॉन, शिक्षण मंडळ अध्यक्ष उस्मान हिरोली अशी पदे देत असतानाच मागील २००७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीन त्यांनी मुस्लिम समाजाला एकूण १४ उमेदवार दिले. रमजान ईद व अन्य मुस्लिम समारंभात त्यांचा आवर्जुन पुढाकार असतो.

पुण्यातील ख्रिश्चन समाजातही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खा. सुरेश कलमाडींचे मोठे योगदान असून, गेल्या २००७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे ख्रिश्चन समाजाचे ४ उमेदवार त्यांनी दिले होते.            

पुण्यातील शिख बांधवांच्या गुरूद्वाराबाबत डिफेन्सशी संबंधित काही प्रश्न होते. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी खा. सुरेश कलमाडींनी संपर्क साधून, पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवून घेतले.
Facebook Profile twitter linkedin blog mobile version Qik