ऐतिहासिक पुणे हे आता जागतिक दर्जाचे, कीर्तीचे Global City बनत आहे. ‘फोर्बस्’ (Forbes)
या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मासिकाने Top Ten Emerging Cities in the World मध्ये
पुण्याचा समावेश केला आहे. ही प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटणारीच बाब आहे.एकेकाळी
सायकलींचे असलेले पुणे हे देशातले highest स्कू टर, मोटार - सायकल चे शहर बनले आहे.सर्वाधिक
Personal Computer पुण्यात आहेत. पुणे हे आयटी क्षेत्रातही आघाडीवर असून देशातील सुमारे
१२%* IT तंत्रज्ञ पुण्यात आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला असून, सध्या दुबई, सिगापूर, फ्रँकफूट येथे थेट विमानसेवा
सुरू झालेली आहे. तसेच पुण्यापासून जवळ राजगुरूनगर येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ
होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन होणार असून, केंद्रीय
रेल्वे मंत्र्यांनी तशी घोषणा व तरतूदही केली आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे.
पुण्याचे अनेक आंतरराष्ट्रीय शहरांशी नाते जडले असून, पुणे - ब्रेमेन, पुणे - सॅनहोजे,
पुणे - ओकायामा मैत्री करार झालेले आहेत. पुण्यात जागतिक दर्जाचे International Convention
Centre सुरू झाले. जगात चीन आणि जर्मनी पाठोपाठ तिसरे केंद्र पुण्यात सुरू झाले. विविध
देशातील नामवंत कंपन्यांची व्यापार कार्यालय पुण्यात सुरू झाली आहे तसेच ब्रिटीश व्यापार
कार्यालयही पुण्यात सुरू झाली आहे.
७१ देशांचा सहभाग असणारी ३ री राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २००८ मध्ये पुण्यात संपन्न
झाली. यामुळे आशिया खंडाला हा प्रथमच मान मिळाला.केवळ देशाचेच नव्हे तर सार्याल जगाचे
लक्ष पुण्याकडे आहे.
कोणत्याही शहराच्या विकासासाठी पायाभूत नागरी सुविधांचा विकास, गुंतवणूक व रोजगाराची
निर्मिती आणि त्यासाठी दृष्टि आवश्यक. पुण्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या खा. सुरेश
कलमाडींच्या रूपाने पुण्याला ही दृष्टि मिळाली. पुणे सध्या Take Off Stage ला आहे.
पुणे IT CITY बरोबरच Auto Hub, Animation – Gaming चे देशातील महत्वाचे केंद्र बनले
आहे. पुणे आता सर्वार्थाने Global City बनण्याकडे वाटचाल करीत आहे.